अहमदनगर : प्रभागातील बंद विद्युत दिवे सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नगरसेवकांनी एक लाखाचा स्वेच्छा निधी दिला. नगरसेवकांनी एकत्रित स्वेच्छा निधी देण्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र, विद्युत विभागाकडून नरगसेवकांची बाेळवण सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेचा विद्युत विभाग पथदिवे घोटाळा मध्यंतरी चांगलाच गाजला. यामुळे पथदिव्यांची कोट्यवधींची बिले थकलेली आहेत. त्यामुळे दिवाबत्तीची कामे नकोच, अशी ठेकेदारांची भूमिका आहे. त्याचा थेट परिणाम शहरातील दिवाबत्तीवर झाला. त्यावर नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रत्येकी एक लाखाचा स्वेच्छा निधी विद्युत विभागाला दिला. एखाद्या कामासाठी एकत्रित निधी देण्याचा नगरसेवकांचा हा पहिलाच निर्णय आहे. यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अशा नगरसेवक बाळगून होते. मात्र, विद्युत विभागाने हे साहित्य टप्प्याटप्प्याने खरेदी केले. पहिल्या टप्प्यात २६ लाखांचे साहित्य खरेदी केले. दिवाळीपूर्वी नगरसेवकांना विद्युत साहित्य वाटप करण्यात आले; परंतु हे साहित्यही अपुरे होते. शहरातील बंद दिवे सुरू करण्याच्या मागणीसह विद्युत विभाग प्रमुखपदी अभियंत्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्यासह नगरसेवकांनी उपोषण केले. उपोषाची दखल घेऊन विद्युत विभागप्रमुखपदी वैभव जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, स्टोअर विभागाकडून विद्युत साहित्यही खरेदी केले; परंतु विभागप्रमुख नसल्याने हे साहित्य विद्युत विभागाने ताब्यात घेतले नाही. सोमवारी हे साहित्य ताब्यात घेऊन नगरसेवकांच्या मागणीसानुसार वाटप करण्यात येणार आहे. विद्युत विभागाने ७०० बल्प व २००० ट्युबा खरेदी केल्या आहेत. नागरसेवकांची मागणी यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. नगरसेवकांना समान साहित्याचे वाटप केल्यास प्रत्येकी ३० ट्युबा व १० बल मिळतील. प्रभागातील अनेक दिवे बंद आहेत. त्या तुलनेत मिळणारे दिवे कमी असून, नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
...
असे आहे विद्युत साहित्य
.....................चोक-७००
बल्प- ७००
केबल- १०० बंडल
ट्युबा- २०००
....................................चोक- २०००
...