अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक विनोद वानखेडे यास १ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने ५ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी हा निकाल दिला.तक्रारदार यांच्या सेवा कालावधीतील ३०० दिवस हक्क रजेचे रोखीकरण बील मंजुरीसाठी बिलावर ना हरकत शेरा देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार २६ आॅगस्ट २०१४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विनोद वानखडे यास पंचासमक्ष १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी गुन्ह्याचा तपास करुन वानखेडे यांच्या विरुध्द विशेष न्यायालयात २३ डिसेंबर २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल केले. चार वर्षे सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीस दोषी धरत शुक्रवारी शिक्षा सुनावली.लाचलुचपत प्रतिबंधक कायदासन १९८८ चे कलम ७ प्रमाणे ३ वर्षे साधे कारावसाची व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधे कारावस. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १३(१) सह १३(२) प्रमाणे ५ वर्षे साधे कारावासाची व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधे कारवासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. ए.एम. घोडके यांनी काम पाहिले.
1 हजार रुपयांची लाच : पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकास 5 वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:25 IST