शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी महिलेने परतविला बिबट्याचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 07:40 IST

एका महिलेने हल्लेखोर बिबट्याला धाडसाने पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी नर्सरी येथे घडली. मीना मधुकर राजुळे (५३) असे या महिलेचे नाव

राहुरी (जि. अहमदनगर) : एका महिलेने हल्लेखोर बिबट्याला धाडसाने पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी नर्सरी येथे घडली. मीना मधुकर राजुळे (५३) असे या महिलेचे नाव असून शेताच्या बांधावर गवत कापत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत दगडांचा मारा करून, तसेच हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पळवून लावले.

बिबट्या हा जेमतेम साठ-सत्तर फुटांवर आल्यानंतर मीना यांनी खुरपे त्यावर उगारले. त्यामुळे बिबट्या काहीसा थबकला. हे पाहून त्या पुन्हा बिबट्याच्या दिशेने धावल्या. हा आक्रमक प्रतिकार पाहून बिबट्याने उसाच्या दिशेने धूम ठोकली़ त्यानंतर मीना यांनीही गवताचे गाठोडे डोक्यावर घेऊन घर गाठले. पिंजऱ्यातील बिबट्याला हलविण्यास उंदरगावमधील ग्रामस्थांचा विरोध

केत्तूर (जि. सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) शिवारातील उजनी जलाशयाच्या पट्ट्यात दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेला बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजºयात रविवारी पहाटे अडकला. मात्र पाळीव प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यांची शासनाकडून भरपाई मिळत नाही, तोपर्यंत पिंजरा हलवू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे हा पिंजरा हलविता आला नाही. तसेच या भागात आणखी एक बिबट्या आणि दोन पिल्ले असल्याचेही नागरिकांना म्हणणे आहे.गेल्या महिन्यापासून अनेकांनी बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे शेतमजूरही शेतात जायला घाबरतात. मला बिबट्याची आजिबात भीती वाटत नाही़ रविवारी मला पहिल्यांदाच बिबट्या दिसला. मी त्याचा कसून प्रतिकार केला.- मीना राजुळे, शेतकरी.

टॅग्स :leopardबिबट्याWomenमहिला