शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शतायुषी मतदार आयोगाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 14:58 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील शंभरी पार केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील शंभरी पार केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार ७८५ शतायुषी मतदार आढळले असून, त्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळी योग्य तो सन्मान देऊन त्या आधारे मतदार जागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे.राज्य निवडणूक विभागाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा निवडणूक शाखेकडून आगामी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ज्या मतदारांचे वय शंभरपेक्षा जास्त आहे, अशा सर्व मतदारांची पडताळणी करून या मतदारांचे वय खरोखरच शंभर पेक्षा जास्त आहे किंवा कसे, याची खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मतदारांची त्यांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येत आहे. आतापर्यंत यात २२३४ जणांचे वय शंभरी पार आढळले. परंतु खातरजमा केली असता प्रत्यक्षात ७८५जणांचे वय १०० पेक्षा जास्त आहे. यापैकी अनेकजण अजूनही धडधाकट आहेत. मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोग ज्याप्रमाणे विद्यार्थी, सेलिब्रिटींची मदत घेते, त्याप्रमाणे या शतायुषी मतदारांद्वारे मतदार जागृती करून त्यांनाही विशेष सन्मान मिळणार आहे. शंभरी पार केलेले मतदार जर मतदान करू शकत असतील तर इतरांना काय अडचण आहे, असा संदेश त्यातून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.जिल्हा निवडणूक शाखेने केलेल्या या तत्पर सर्वेक्षणाचे नाशिक येथील बैठकीत प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी विशेष कौतुक केले. नगर जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांतही अशीच मोहीम राबवून शतायुषी मतदारांकरवी मतदार जागृती करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.शंभरपेक्षा जास्त वय असलेले सर्व मतदार हे लोकशाही प्रक्रियेतील पारतंत्र्य व स्वातंत्र्य या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जमा करुन या मतदारांना आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळी योग्य तो सन्मान देण्यात येईल. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारीतरूणांचे जसे आयडॉल असतात, त्याप्रमाणे शंभरी पार केलेले मतदारही आयडॉल होऊ शकतात. या मोहिमेद्वारे शतायुषी मतदारांना लोकांसमोर येण्याची संधी मिळणार आहे. त्यांचा योग्य तो सन्मान जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात येईल. - अरूण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर