शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अहमदनगरमध्ये सहकारी बँकेची शाखा फोडली, सायरन वाजल्यामुळे लुटण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:58 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.शनिवारी पहाटे चोरट्यांनी बँकेच्या मुख्य दरवाजाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये चोरट्यांनी कागदांची उचकापाचक सुरु केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तिजोरीकडे वळविला. तिजोरी फोडायला गेले असताच सायरन वाजू लागला त्यामुळे चोरट्यांनी बँकेतून धूम ठोकली.तत्पुर्वी बँकेच्या वरच्या मजल्यावरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्यालय फोडले. मात्र तेथे चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी बँकेच्या बाजूच्याच दोन टप-या फोडल्या. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी श्वान पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. नगर तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, सहायक निरीक्षक महेश क्षीरसागर, अनंत सत्रे हे घटनेचा तपास करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँक