---------------------
बोठे शोधत होता पळवाटा
बोठे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो सतत तब्येतीविषयी तक्रारी करू लागला. हैद्राबा येथून आणताना पोलिसांनी त्यांची सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. दरम्यान, हैद्राबाद येथे असताना बोठे याने तेथील आयुक्त कार्यालयात जाऊन केवळ प्रवेश नोंद केली. तेथे तो कुणालाही भेटला नाही. तेथे गेल्याचे भासवून आपण फरारी नसून कायदेशीर प्रयत्न करत असल्याचे दाखविण्यासाठी त्याचा हा प्रयत्न असावा, असा संशय पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
तो आय फोन होणार ओपन
बोठे फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून तो वापरत असलेला आय फोन जप्त केला. हा फोन मात्र ओपन झाला नाही. आता बोठेला अटक झाल्याने तो फोन ओपन होऊन त्यातून महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांना मिळू शकतात.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
हैद्राबाद येथे सलग पाच दिवस ऑपरेशन राबवून बोठे याला बोड्या ठोकणाऱ्या
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरव केला.
यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक यादव, जामखेड ठाण्याचे निरीक्षक
संभाजी गाकवाड, नगर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप,
निरीक्षक ज्योती गडकरी, कर्मचारी सत्यजीत शिंदे, श्याम जाधव, राहुल डोळस,
जयश्री फुंदे, रितेश वेताळ, भास्कर मिसाळ, सुरेश सानप आदींचा गौरव
करण्यात आला.