शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक एकत्रित लढविण्याचा दोन्ही काँग्रेसचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:29 IST

श्रीगोंदा नगरपालिका व इतर सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकिय आखाड्यात भाजपा व दोन्ही काँग्रेसची आघाडी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका व इतर सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक घेऊन घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकिय आखाड्यात भाजपा व दोन्ही काँग्रेसची आघाडी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे उपस्थित होते.आ़ जगताप म्हणाले, आता भाजपाच्या विरोधात लाट उसळली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनाधार मिळणार आहे. श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे हे धोनी तर अण्णासाहेब शेलार हे विराट कोहलीप्रमाणे फलदांजी करीत आहेत. त्यामुळे चिंता राहिलेली नाही. पालिकेसाठी काँग्रेसची सत्ता असताना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. मात्र श्रेय भाजपाने लाटले आहे, असा टोला लगावला.नागवडे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. ही आघाडी ठेवत भाजपाला धोबीपछाड करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे.अण्णासाहेब शेलार म्हणाले, आता वातावरण बदलले आहे. भाजपाच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत कोण नगराध्यक्ष, कोण नगरसेवक होईल याला महत्व नसून ते आघाडीचे झाले पाहिजेत हे अधिक महत्वाचे आहे.यावेळी एकनाथ आळेकर, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, राजू गोरे, जालिंदर घोडके, सादिक जमादार, फक्कड मोटे, असीफ इनामदार, शिवाजी शेळके, अशोक आळेकर आदी उपस्थित होते. आभार दादा औटी यांनी मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा