शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बोराडे; उपाध्यक्षपदी प्रताप गांगर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:47 IST

अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे.कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सर्वांना संधी मिळावी, म्हणून दर सहा महिन्यांनी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जात आहे. त्यानुसार सोसायटीचे मावळते अध्यक्ष शशिकांत रासकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व्ही. के. मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यांना प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र पवार व प्रभारी उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांचे सहकार्य लाभले. अध्यक्षपदासाठी नारायण बोराडे यांच्या नावाची सूचना संचालक शशिकांत रासकर यांनी मांडली. या सुचनेस संचालक राजाबापू पाठक यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी प्रताप गांगर्डे यांच्या नावाची सुचना संचालक विलास वाघ यांनी मांडली व अनुमोदन संचालक हरी शेळके यांनी दिले. यावेळी संस्थेचे संचालक संजय कडुस, सुभाष कराळे, अरुण जोर्वेकर, भरत घुगे, सोपान हरदास, संतोष नलगे, संजु चौधरी, अरुण शिरसाठ, ज्ञानदेव जवणे, मोहन जायभाये, वालचंद ढवळे, इंदु गोडसे, उषा देशमुख, अशोक काळापहाड, स्विकृत संचालक विलास शेळके, कैलास डावरे, सभासद श्रीकांत भगत, धैर्यशंभो सोलाट, बाळू फटांगरे आदी उपस्थित होते.बोराडे म्हणाले की, संस्थेच्या निवडणूक काळात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. येत्या काळात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सभासदांना कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद