शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील बूटफेक प्रकरण : अनिल राठोड न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:54 IST

महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी आरोपी असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड गुरूवारी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले.

अहमदनगर : महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी आरोपी असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड गुरूवारी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयातहजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांचा मुक्काम सध्या उपकारागृहात आहे.बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम रखडल्याने शिवसेना नगरसेवकांनी मे महिन्यात मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी अनिल राठोड हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसेनेचा कार्यकर्ता मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. याप्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राठोड यांच्यासह शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते अशा १५ ते २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यानच्या काळात राठोड यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.दरम्यान, गुरूवारी राठोड स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर हजर केले. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी राठोड यांना पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीचे वकील अ‍ॅड. विश्वासराव आठरे यांनी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने राठोड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने लगेच जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेत या गुन्ह्याचा तपास होणे बाकी असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यामुळे राठोड यांची रवानगी उपकारागृहात (सबजेल)मध्ये करण्यात आली.प्रकृती अस्वास्थ्यामुळे राठोड यांना गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस