अहमदनगर: महानगरपालिकेत प्रभारी शहर अभियंता यांच्यावर बूट फेकून दंगा केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सात नावे समाविष्ट केली आहेत़ या गुन्ह्यात आता एकूण १८ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत़नगर शहरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याच्या कामावरून २६ एप्रिल रोजी दुपारी २० ते २५ जणांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली़ याचवेळी शिवसेनेचा कार्यकर्ता मदन आढाव याने आयुक्तांसमोरच प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला़तसेच याबाबत गुन्हा दाखल केला तर तुझ्या विरोधात खोटी तक्रार देऊ अशी सोनटक्के यांना धमकी दिली़ या घटनेनंतर अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अशोक बडे, नगरसेविका कमल दत्तात्रय सप्रे, रिता शैलेश भाकरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मदन आढाव, निलेश भाकरे, आकाश कातोरे, विशाल वालकर, गिरीष जाधव, नगरसेवक नज्जू पैलवान यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी बडे व आढाव यांना अटक केली़आढाव याला या प्रकरणात जामीन मिळाला आहे़ दरम्यान या आंदोलनात बूट फेकल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे़ या व्हिडिओत आंदोलन करताना दिसणाºया सर्व जणांची नावे पोलिसांनी या गुन्ह्यात वर्ग केली आहेत़ त्यामध्ये सेनेचे नगरसेवक गाडे यांच्यासह सात जणांचा समावेश करण्यात आला.अटकपूर्वसाठी राठोड यांची न्यायालयात धावगुन्ह्णात नाव असलेल्या माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सर्व जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे़या अर्जावर न्यायालयात बुधवारपासून सुनावणी सुरू झाली आहे़फरार आरोपींचा शोधबूट फेकल्याच्या प्रकरणात आणखी सात जणांची नावे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे़ या गुन्ह्णात आढाव व बडे यांना वगळता इतर कुणालाही अद्यापपर्यंत अटक झालेली नाही़
बूट फेक प्रकरण : नगरसेवक योगीराज गाडेसह सहा आरोपी निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:58 IST