शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

बॉम्बपेक्षाही विषमता स्फोटक

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

अत्याचारविरोधी परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन

अहमदनगर : राजकीय नेत्यांना लोकांची फक्त मत हवी आहेत. निवडणुकांचा प्रचार ज्या हायटेक पद्धतीने होतो, त्याचपद्धतीने अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेत नाहीत. देशात दहा कोटी म्हातारे आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? विषमता वाढत राहिली तर जगायचे कसे? विषमता ही बॉम्बपेक्षाही स्फोटक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड बाबा आढाव यांनी केले. सामाजिक न्याय परिषदेतर्फे शनिवारी सहकार सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय अत्याचार विरोधी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड आढाव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत विद्याताई बाळ, अ‍ॅड. असिम सरोदे, सामाजिक न्याय परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वाल्मिक निकाळजे, अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आढाव म्हणाले, जाती अंताची लढाई सुरू केली का? जात-धर्माबद्दल वैज्ञानिक सत्य नाही म्हणून हे विषय अभ्यासक्रमात कधीच आले नाहीत. राजकारणात जाती अंताचा निर्धार नाही. खर्‍या इतिहासाचे संशोधन नाही. सरकार बदलले असले तरी सनातनी व्यवस्था त्यांच्याकडे जात आहे. पुतळ््यांच्या उंचीची स्पर्धा लागली आहे. भावनिकेतवर जोर दिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांगायचा अजेंडा वेगळा आणि छुपा वेगळा आहे. केंद्रात बहुमताने सरकार आले असले तरी यामुळे धर्मनिरपेक्षता, समाजवाद नव्हे तर राज्यघटनाच धोक्यात आली आहेत. त्यांच्या वाट्याला सरकार आणि आमच्या वाट्याला फक्त खैरलांजी-खर्डा हेच आहेत का? असा सवाल आढाव यांनी केला. अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत म्हणून सरकारने अद्याप तरी काहीच केले नाही, असे सांगून आढाव यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले. विद्याताई बाळ म्हणाल्या, अत्याचाराच्या घटना जरी दुर्दैवी असल्या तरी महाराष्ट्रात नवी पहाट आली आहे. न्याय मिळवायचा असेल तर त्याची भिस्त तरुणांवर आहे. शरद पवार यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची सामाजिक संवेदना बोथट झाली आहे. सत्तेमध्ये मराठ्यांची मिजास आहे. केंद्रात हिंदुत्त्ववादी बहुमत आहे, त्यामुळे येथून पुढे मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. जाती अंताच्या लढ्यात सर्वांनाच सक्रीय व्हावे लागेल. वर्णव्यवस्था तर्कसंगत नाही. पुरुष आणि स्त्री यांनी हातात हात घालून घर व समाज चांगला राहील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलगी शिकते, मुले बेकार राहतात. यामधूनच अत्याचारासारखे प्रसंग घडतात, हे दुर्दैवी आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भानुदास गजभिव, वाल्मिक निकाळजे, बबनराव वडमारे, मीनाक्षी शिंदे, पंडित कांबळे, सिमांत तायडे यांची भाषणे झाली. अरुण खैरे यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)