शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दूषितपाणी प्रश्नी शेवगाव येथे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:35 IST

दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

शेवगाव : दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.शेवगाव शहरात काही दिवसांपासून सुरु असलेल्या पिवळसर दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुमारे ५० हजारांपर्यंत जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहर व परिसरात साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे. नागरिकांना तातडीने शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. नगर परिषदेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणांमुळे आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली. शेवगाव, पाथर्डी शहरासह ५४ गावच्या सुमारे दीड लाख जनतेची तहान भागविणाºया प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे.माजी जि.प. सदस्य पवनकुमार साळवे, भाकपचे प्रदेश सचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, प्रा.किसन चव्हाण, कॉ.संजय नांगरे, माजी सभापती अविनाश मगरे, प्रकाश तुजारे, विजय बोरुडे, दत्तात्रय फुंदे, एकनाथ कुसळकर, सुनील जगताप, शीतल पुरनाळे, हमीद पठाण, गणेश रांधवणे, विजय जोशी, राजू मगर आदींची भाषणे झाली. साळवे यांनी शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. नगरपरिषदेच्या वतीने निवेदन स्वीकारून अशुद्ध पाणी पुरवठ्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी प्रभारी मुख्य कार्यकरी अधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. आंदोलनाबाबत निवेदन देऊनही पदाधिकारी व अधिका-यांपैकी कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही. नागरिकांना आठवडाभरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव