शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहरात कुरीअर पार्सलमध्ये स्फोट, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:46 IST

अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा कसून तपास सुरु

अहमदनगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानाच्या पाय-यांवर रक्ताचा सडा पडला होता. जखमी तिघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक व निकामी पथकाकडून हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची तपासणी सुरू आहे. स्फोटानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक झालेल्या या स्फोटाने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोट झालेल्या पार्सलमध्ये नेमके काय होते, याचा बॉम्ब शोधक पथकाकडून शोध सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीत कुरिअरमधील पार्सल सावेडीतून आलेले होते. पुणे येथे सामाजिक संस्था चालविणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावे हे पार्सल पाठविण्यात आले होते. पार्सल ज्या पत्त्यावरून पाठविण्यात आले होते, तो पत्ता चुकीचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र हे पार्सल दुकानातील कर्मचारी का फोेडून पाहत होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेचा कोतवाली पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहेत.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस