शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमधील पाण्याच्या टाकीत तरूणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:42 IST

शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील नियोजित दवाखान्याचे अर्धवट अवस्थेत असलेल्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत इस्माईल उस्मान सय्यद (वय ३८, सदाफुले वस्ती) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली.

जामखेड : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील नियोजित दवाखान्याचे अर्धवट अवस्थेत असलेल्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत इस्माईल उस्मान सय्यद (वय ३८, सदाफुले वस्ती) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली.इस्माईल मोलमजुरी किंवा बसस्थानकात चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करीत होता. ३ जूनपासून तो बेपत्ता होता. बसस्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस नवीन दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी त्याची चप्पल व कपडे आढळले. त्याच्या पत्नीस संशय आल्याने ती कपडे सापडले तेथे शोध घेत होती. तेव्हा तिला पतीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ही टाकी पाण्याने भरली होती. एका टाकीत रक्ताळलेले पाणी पाहून नातेवाईकांना संशय आला. याबाबत पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस कॉँस्टेबल बापू गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी इंजिन लावून टाकीतील पाणी काढले असता इस्माईलचा मृतदेह दिसला. नागरिकांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. मयत इस्माईल सय्यद यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा कब्रस्थानमध्ये दफनविधी पार पडला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड