आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे (वय ३८) या इसमाचा मृतदेह तलावाच्या परिसरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोपान हे गेल्या मंगळवारपासून (दि.११) बेपत्ता होते. रविवारी अकराच्या सुमारास गावातील एक व्यक्ती तलाव परिसरात गेली असता गवतामध्ये मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. गेल्या सहा दिवसांपासून गायब असलेल्या सोपान शिंदे या इसमाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांनी ओळखले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला; परंतु मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे उच्चस्तरीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. मयताच्या नातेवाइकांनी गायब असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी दाखल केली आहे. सोपान शिंदेचा घातपात झाला की अन्य काही याविषयी उलटसुलट चर्चा परिसरात रंगली आहे. शवविच्छेदनानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलराव पाटील करत आहेत.
160521\20210516_175931.jpg
मयत सोपान शिंदेचा फोटो