नेवासा : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे उद्भवलेल्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी ‘लोकमत’ व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील शिवशंभो ॲग्रो सर्व्हिसेस येथे आयोजित शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला. यावेळी सुरेशनगरचे माजी सरपंच पांडुरंग उभेदळ, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डिले, बाळासाहेब देवखिळे, शिवशंभो ॲग्रोचे सुरेश उभेदळ, रमेश सावंत, सुरेश झिंजुर्डे, जयकिसन वाघ, भालचंद्र वरखडे, नितीन पाठक, संदीप आलवणे, अष्टविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे, डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविकात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अभिजित शेळके यांनी संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत रक्तदानाचे महत्त्व विषद केले. पांडुरंग उभेदळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबिरास वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे
अभिजित शेळके, योगेश वरखडे, महेश उंदरे, संकेत नरसाळे, अजय थोरात, अनिकेत अवारे, प्रवीण थोरात, सचिन रेडे, कानिफनाथ मुरदारे,
ऋषीकेश वरखडे, प्रताप वरखडे, ऋषीकेश घोरपडे, गणेश भणगे, अमृत उभेदळ, निखिल पवार, विशाल पिंपळे, बंदुराजे नेहे, गणेश वरखडे, अष्टविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे, डॉ. मुकुंद शिंदे, शाहूराज जगताप, वरलक्ष्मी श्रीपत, पूजा प्रधान, गणेश गायकवाड, नलिनी मुसळे, संजय मुळे, वंदना देसाई, आकाश कोळगे यांनी सहकार्य केले. ‘लोकमत’चे नेवासा तालुका प्रतिनिधी सुहास पठाडे यांनी आभार मानले.
-----
शिबिरामधील रक्तदाते असे..
किरण पारे, अभिमान निकाळजे, महेश धनवटे, किरण चव्हाण, सचिन निकम, अक्षय विधाते, संभाजी भांगे, अजित अंबाडे, सुभाष पवार, नारायण जायभाय, संदीप मुरदारे, सचिन कर्डिले, कृष्णा तेलोरे, प्रसाद मडके, विराज दिघे, प्रसाद औटी, गणेश उंदरे, महेश उंदरे, अनिल तट्टू, विकी भणगे, प्रसाद भणगे, नीलेश भोसले, रमेश सावंत, सुरेश झिंजुर्डे, प्रदीप चव्हाण, गणेश वरखडे, अनिकेत उंदरे, विशाल गायके, संजय नेहे, सुजित गायके, अभिषेक वरखडे, आदिनाथ वरखडे, नीलेश गरुटे, विशाल पिंपळे, आकाश काळे, महेश साळुंके, संतोष गायकवाड, सूरज पवार, रोहन पवार, अक्षय वरखडे.
----
०४ नेवासा फाटा
नेवासा फाटा येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रक्तदाते व मान्यवर.