स्वातंत्र्यसेनानी व लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी व कर्जत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान करण्यासाठी महिलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रोटरीच्या बैठकीला रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, डॉ. संदीप काळदाते, नितीन देशमुख, अभय बोरा, काकासाहेब काकडे, विशाल मेहेत्रे, नारायण तनपुरे, सचिन धांडे, संतोष सुरवसे उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने आयोजित बैठकीला अध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर, राहुल सोनमाळी, आशिष शेटे, किशोर बोथरा, दादासाहेब पारखे, भाऊसाहेब पिसाळ, अमोल सोनमाळी, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. शिबिरात कर्जतकरांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी कर्जत येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST