लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने साईनगरीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात साईबाबा संस्थान, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (शिर्डी विमानतळ), श्रीराम प्रतिष्ठान, श्रीरामनगर, भारतीय जैन संघटना, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक नारायण न्याहाळदे, शिर्डी विमानतळावरील सीआयएसएफचे उपकमांडंट दिनेश दहीवाडकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड, साईमंदिर सुरक्षाप्रमुख अण्णासाहेब परदेशी, उपनिरीक्षक अशोक लाड, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोंदकर, राम पवार, भारतीय जैन संघटनेचे नरेश पारख, कमलेश लोढा, नीलेश गंगवाल, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, राजेंद्र गोंदकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके यांनी रक्तदान घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला.
पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे व साईमंदिर प्रमुख रमेशराव चौधरी यांनी रक्तदान करून शिबिराचा श्रीगणेशा केला. यावेळी प्रांताधिकारी शिंदे, तहसीलदार हिरे, रक्तपेढीच्या डॉ. मैथिली पितांबरे यांची उपस्थित होत्या.
वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक नारायण न्याहाळदे हे काही तांत्रिक कारणाने रक्त देऊ शकले नाही, हे समजताच त्यांची पत्नी कल्पना न्याहाळदे यांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान करून पतीची उणीव भरून काढली.
साईनाथ रक्तपेढीचे डॉ. सूर्यकांत पाटील, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. भारत धोका, डॉ. सोनाली घोडके, मिलिंदा आराक, चंद्रकांत लुटे, विठ्ठल शिरसाठ, विजया राऊत, सागर भगत, सविता मानकर, अलिया शेख, सुनीता वाघमारे, माया खंडीझोड, ज्योती गोसावी, गोरक्षनाथ नवले, अमोल देवकर, सुनील गागरे, सचिन सापते, लक्ष्मण धुमसे, लोकमत शिर्डी प्रतिनिधी प्रमोद आहेर यांनी परिश्रम घेतले.
रक्तदाते
महसूल विभाग-कामगार तलाठी रमेश झेंडे, अपर्णा शीलावंत, भाऊपाटील जाधव, सूर्यकांत खोजे, योगेश पालवे, हेमंत पंधारे.
पोलीस विभाग-प्रवीण लोखंडे, अमोल गंगलवाड, रवींद्र साठे, राहुल डोके, अनिल चव्हाण, सुभाष थोरात.
सीआयएसएफ - शिर्डी विमानतळ-सचिन वर्मा, अजित पुरोहित, प्रमोद गेवराई, संजय औटी, उमेश बेडरकर, शेख तौसिफ, रोहिदास कोळी.
साईसंस्थान-रमेशराव चौधरी, सुरेश पवार, सुभाष घोडे, पोपट फरगडे, क्रिकेटर साईराज गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते-रवींद्र गोंदकर, कल्पना न्याहाळदे, वृषभ काळे, सोन्याबापू आग्रे, संतोष शेळके, तुषार काळोखे, शुभम काळोखे, आकाश शिंदे, प्रदीप भालके, कृष्णा वाघे, गणेश गमे, महेंद्र डांगे, सुहास गवंडी, गौरव सहदेव.