शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या

By शेखर पानसरे | Updated: December 24, 2022 16:20 IST

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही

संगमनेर : शेतात माल पिकवणं शेतकऱ्याच्या हातात आहे, पण बाजारात विकणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. त्यामुळेच, अनेकदा शेती मालाला भाव न मिळाल्याने बळीराजाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा लाल चिखल केल्याचं आपण पाहिलंय. काहींना बाजारात चक्क फुकट टमाटे वाटल्याचं दिसून दिसून आलंय. आता संगमनेर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने चक्क शेतात मेंढ्या-शेळ्या सोडल्या आहेत. हतबल झालेल्या या बळीराजाची करुण कहानी अनेकांचे डोळे पाणावणारीच आहे.  

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही. बाजार समितीमध्ये, बाजारात टोमॅटो विक्रीसाठी नेले असता घरातून पैसे घालण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याने संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत विठ्ठल कढणे यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात मेंढ्या आणि शेळ्या सोडल्या आहेत.         शेतकरी शशिकांत कढणे यांनी सांगितले की, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो हे बाजार समिती, बाजारात विक्रीला नेण्यासाठी गाडीचे भाडे सुद्धा खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो रोप, शेतीची मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजूरी, मंडप बांधण्यासाठी (बांधणी) लागणारी तार, बांबू, सुतळी आणि टोमॅटो काढणी अशा एकूण खर्चाचा विचार केला असता तो एकरी साधारण सव्वा लाख रुपये इतका होतोच. एवढा खर्च होऊनही सध्या बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी नेल्यानंतर हाती कोऱ्या पावत्यांचे शिवाय काहीही पडत नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरMarketबाजार