शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

काळे-कोल्हेंबरोबर औताडेही आखाड्यात

By admin | Updated: June 16, 2014 00:10 IST

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पक्षकेंद्रीत नसून ते व्यक्तीकेंद्रीत असल्याचे आजवरचे गणित़ काळे आणि कोल्हे यांनी तिसरी शक्ती उदयास येऊच दिली नाही़

सचिन धर्मापुरीकर, कोपरगावकोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पक्षकेंद्रीत नसून ते व्यक्तीकेंद्रीत असल्याचे आजवरचे गणित़ काळे आणि कोल्हे यांनी तिसरी शक्ती उदयास येऊच दिली नाही़ परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून नितीन औताडे यांचा पर्याय मतदारांसमोर असल्याने ही लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर ३५ वर्षे अधिराज्य केले़ २००४ च्या निवडणुकीत बिपीन कोल्हे यांना रिंगणात उतरविण्यात आले़ यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते स्व़ शंकरराव काळे यांचे पुत्र अशोक काळे शिवसेनेची उमेदवारी घेऊन उभे होते़ तत्पूर्वी काळे घराण्याकडून शंकरराव काळे, संभाजीराव काळे यांनी या मतदारसंघात नशिब आजमाविले होते़ परंतु कुणालाही यश आले नाही़ अशोक काळे यांच्या रूपाने कोपरगावातून आमदार होण्याची संधी काळे घराण्याला लाभली़ २००९ च्या निवडणुकीतही बिपीन कोल्हे विरूद्ध अशोक काळे असाच सामना रंगला, त्यातही अशोकरावांनी बाजी मारली़काळे आणि कोल्हे या दोन राजकीय धुरिणांनी कोपरगावमध्ये तिसरी शक्ती उदयास येऊ दिली नाही़ सहकारी साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांच्या जोरावर तिसऱ्या शक्तीचा उदय होण्याआधीच खच्चीकरण केले जात असे. त्यामुळे लढत काळे आणि कोल्हे यांच्यातच होते़मागील निवडणुकीत बाबासाहेब डमाळे, बाळासाहेब जाधव यांनी अनुक्रमे रिडालोस व मनसेकडून उमेदवारी घेऊन लढत देण्याचा प्रयत्न केला़ मात्र तो अतिशय तोकडा पडला़ साधारण अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी कोल्हे गटातून नितीन औताडे बाहेर पडले़ परंतु त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही़ काळे-कोल्हे या प्रस्तापितांविरूद्ध आपली लढाई असल्याचे सांगून औताडे यांनी कोपरगाव तालुका स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली़ महिन्याभरातच या आघाडीने जिल्हा परिषदेचा पोहेगाव गट आणि पंचायत समितीचे पोहेगाव आणि चांदेकसारे हे गण ताब्यात घेऊन तालुक्याचे लक्ष वेधून घेतले़ औताडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाठबळ असल्याचेही बोलले जाते़ महत्वाकांक्षी असलेल्या औताडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला आहे़ त्यांच्या उमेदवारीमुळे काळे, कोल्हेंचे नुकसान होते की कोणा एकाच्या ते पथ्यावर पडतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे़ शिवसेनाअशोक काळे  ८४६८०राष्ट्रवादीबिपीन कोल्हे  ७७९८९रिपाइं (आ.) बाबासाहेब ढमाले  ४४३१इच्छुकांचे नावपक्षअशोक काळे शिवसेनाबिपीन कोल्हे  राष्ट्रवादीनितीन औताडे  स्वाभिमानी विकास आघाडीलोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५५ हजारांचे मताधिक्य