शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:55 IST

शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देअहमदनगर शहर भाजपाचे शुक्रवारी महावितरणच्या अभियंत्याना निवेदनसत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नसल्याची भाजपा पदाधिका-यांची भुमिका 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाने शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात अभियंता बोरसे यांना निवेदन दिले. सत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नाही. मात्र, जनतेच्या भावना आणि मागण्या आम्हाला मांडाव्याच लागतील, अशी भूमिकाही भाजप पदाधिका-यांनी घेतली. 

भारनियमनमुळे वसंत टेकडी येथील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.  इतर जिल्ह्यात २ ते ३ तास तर नगरमध्ये ८ तास भारनियमन का? असा सवाल यावेळी करण्यात आला.  महावितरणकडून नियोजन नसल्याचा आरोप सुवेंद्र गांधी यांनी केला.  एकीकडे पंतप्रधान प्रत्येक घराघरात वीज पोहोचवण्यासाठी आग्रही असतांना दुसरीकडे भारनियमन सुरू असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर देणार? अशा शब्दांत नरेंद्र कुलकर्णी यांनी व्यथा मांडल्या. दरम्यान, अधिक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी भारनियमनामागील भूमिका स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने विजेचा तुटवडा भासत आहे. आणखी दोन दिवस अडचणीचा सामना करावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीसाठी शहरात भारनियमन रद्द करणार असल्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.

 यावेळी भाजपाचे प्रशांत मुथा, सागर गोरे, रोहन डागवाले, मंगेश निसळ, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, भरत ठुबे, नितीन जोशी, आलीस सय्यद, अविनाश सकला, अभिषेक दायमा, सागर कारले, अज्जू शेख, संदीप ढाकणे, सजित खरमाळे, रोषण गांधी, नरेश चव्हाण उपस्थित होते. 

  • बावनकुळेंचे आश्वासन ?
  • आंदोलनावेळी सुवेंद्र गांधी यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बावनकुळे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर बावनकुळे यांनी गांधी यांना संपर्क करुन लवकरच भारनियमन बंद केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.