शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:27 IST

तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भाजपा आक्रमक. अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरतालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ;  शेतकऱ्यांसाठी भाजपा आक्रमक.

अहमदनगर : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या वेळी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश पदाधिकारी युवराज पोटे, रमेश पिंपळे, दिपक कार्ले, अर्चना चौधरी, नंदा चाबुकस्वार, मोहन गहिले, यांच्यासह बाप्पूसाहेब बेरड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, राजू दारकुंडे, प्रशांत गहिले,  गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, नानासाहेब बोरकर, उमेश डोंगरे, शामराव घोलप, सुभाष निमसे, पोपट शेळके, कांबळे सर, देविदास आव्हाड, बबन शिंदे, गणेश भालसिंग, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, राहुल शिंदे,पोपट साठे, संदीप म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत कांबळे, शुभम शेळके, विजय गाडे, सचिन बोरुडे, राहुल गुंड, दत्ता वाडेकर आदी उपस्थित होते.या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी राज्य सरकारवर कडकडून टीका करत राज्य सरकार हे अत्यंत निष्क्रिय स्वरूपाचे सरकार असून या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नसून यांना फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच आनंद असून कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार व प्रशासन अतिवृष्टी, कर्जमाफी, दूध दरवाढ याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. नगर तालुक्यातील फक्त दोन महसूल मंडलातीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून बाकी मंडलात पंचनाने करण्याचे आदेश दिलेले नाहीत हे तालुक्याचे दुर्भाग्य असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.नगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत करावी, दुध दरवाढ करावी तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळवून द्यावी अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.   

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय