शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:02 IST

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़

अहमदनगर : भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, यासाठी सेना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले़महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी हत्या झाली. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली़ पोटनिवडणुकीत अशा प्रकारे हिंसाचार होणे व त्यात कार्यकर्त्याचा मृत्यू होणे ही बाब गंभीर असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे़ त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री दिवाकर रावते व मंत्री कदम रविवारी नगरमध्ये आले होते़ शिवसैनिकांच्या हत्याकांडाला कदम यांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला़ त्यानंतर कार्यकर्ते जगताप यांना घेऊन गेले़ यावरून नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते़ कार्यालयावर हल्ला करणाºयांना मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कदम म्हणाले़पोलिसांच्या मदतीने नगर शहरात गुंडगिरी वाढली असून, यातूनच शिवसैनिकांची हत्या झाली आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी़ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत़ मयतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना स्वीकारत असल्याचे कदम यांनी जाहीर केले़>भाजपाला शिवसेनेचा टेकूगृहराज्यमंत्रिपद सेनेकडे असल्याचे पत्रकारांनी छेडले असता, गृहराज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात ते सर्वांनाच माहिती आहे़ सेना सत्तेत सहभागी नसून, सेनेने फक्त टेकू दिलेला आहे़ गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे़ त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत़ या घटनेचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाईल, त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले़>राष्ट्रवादीला बदनामकरण्याचे षड्यंत्र - पवारकोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अहमदनगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्यांची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हेन उलगडणारे कोडे आहे, असे सातारा येथे राष्टÑवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी सांगितले.