शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर उड्डानपुलाच्या कामाचा भाजपने खेळ चालवलाय - सत्यजीत तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:02 IST

नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते.

अहमदनगर : नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्याचा विसर भाजपला पडला असून, त्यांची फक्त श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरु आहे़ नगरकरांसाठी अस्मिता ठरलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा सध्याच्या सरकारने खेळ चालविला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.तांबे यांनी याबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ तांबे म्हणाले, नगरच्या विकासासाठी हा उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रसिद्धीपेक्षा काम होणे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला़ अनेकांच्या भेटीगाठी केल्या आहेत. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी आज १४ आॅक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, आज उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. भूमिपूजनही झालेले नाही़ त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्याअगोदरच उद्घाटनाची हवा करणे म्हणजे भाजपाचा पोरकटपणा आहे, अशी टीका तांबे यांनी केली़उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात आहे. यासाठी डीटीआर रिपोर्ट नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कामाची कोणतीही वर्कआॅर्डर नाही. खरे तर शासनाच्या नव्या नियमानुसार काम पूर्ण झाले असल्याचा दाखला असल्याशिवाय उद्घाटन ही करता येत नाही, असेही सांगत तांबे म्हणाले.

टॅग्स :ahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलAhmednagarअहमदनगर