शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नगरमध्ये वाढदिवसाचे झिंगाट!

By admin | Updated: June 12, 2016 22:40 IST

अहमदनगर : एका माजी नगरसेवक आणि एका नेत्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले.

अहमदनगर : एका माजी नगरसेवक आणि एका नेत्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले. शनिवारी रात्री अकरा वाजता झालेल्या घटनेत नऊ ते दहा मोटारसायकली आणि दोन चारचाकी वाहनांचा चुराडा झाला तर जाधव कुटुंबीयांतील चार जण जखमी झाले. त्यातील एका जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोफखाना परिसरात दोन गटामध्ये वाढदिवस साजरा करण्यावरून चांगलेच वाद पेटले. या वादात एकमेकांवर तलवार, त्रिशूल, लाकडी दांडक्यांनी वार करण्यात आले. या घटनेत जखमीला लालटाकी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा वाहनांची तोडफोड झाली. यामध्ये नऊ दुचाकी, एक चारचाकी आणि हॉस्पिटलच्या एका अ‍ॅम्ब्युलन्सचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, तोफखाना ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. डी. निकाळजे, उपनिरीक्षक विकास काळे यांनी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी पहिली फिर्याद हॉटेल व्यावसायिक चैतन्य दिलीप जाधव यांनी दिली आहे. यात म्हटले आहे, सूरज सुभाष जाधव, संदीप सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, रोहित मुत्याल, अक्षय किरण आडेप, संदीप गुड्डा यांच्यासह २० ते २५ जणांनी तोफखाना व स्वास्थ्य हॉस्पिटलसमोर वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून तलवार, त्रिशूल, लाकडी दांडके, बाटल्या, दगड फेकून मारहाण केली. यामध्ये प्रताप दत्तात्रय जाधव यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. धनंजय कृष्णा जाधव यांचा वाढदिवस मारुती मंदिरासमोर साजरा करण्यात येत होता. यावेळी काही तरुण तिथे आले आणि त्यांनी येथे वाढदिवस साजरा करायचा नाही, कार्यक्रम ताबडतोब बंद करा, असे सांगत शिविगाळ, दमदाटी केली. यावेळी सुरज याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. दांडके, हॉकीस्टिकने वाहनांची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सवर दगड फेकले. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सच्या काचा फुटल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.दुसरी फिर्याद रविवारी दुपारनंतर दाखल झाली. अर्जुन नरसिंग जज्जर (वय २९, वडापाव गाडी चालक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अभिमन्यू राजू जाधव, धनंजय कृष्णा जाधव, आबा कृष्णा जाधव, राजू दत्तात्रय जाधव, अवि नल्ला, मोहसीन शेख, राहुल मुथा, योगेश लिपाणे, सुमित इपलपल्ली यांच्यासह १० ते १२ जणांनी माळ््याची चावडी येथे येवून मारहाण केली. फिर्यादी जज्जर आणि सूरज सुभाष जाधव हे वडापावच्या गाडीजवळ उभे होते. यावेळी आरोपी वडापावच्या गाडीजवळ आले. बाहेरच्या लोकांचा वाढदिवस आपल्या गल्लीत कसा काय साजरा करता? अशी विचारणा करीत आरोपींनी बंदुकीच्या बटाने तसेच लाकडी दांडके आणि चाकूने मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन नरसिंग जज्जर, सुशांत जाधव, सूरज जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. या फिर्यादीवरून धनंजय जाधव यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)