शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या बसमध्ये तीने दिला बाळाला जन्म : श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 09:36 IST

आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची असेही अनेकादा ऐकले. पण एका महिलेने चालत्या बसमध्येच एका गोंडस मुलाला जन्म दिला.

सोमेश शिंदे

अहमदनगर : आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची असेही अनेकादा ऐकले. पण एका महिलेने चालत्या बसमध्येच एका गोंडस मुलाला जन्म दिला. शुक्रवार(२२ फेब्रुवारी) रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या मढेवडगाव ते घारगावदरम्यान ही सुखद घटना घडली. रिना राकेश वास्कले यांनी गोंडस मुलाला जन्म दिला.मुळचे मध्यप्रदेशातील असणारे रिना आणि तिचा पती राकेश बारामती येथे बांधकाम मजूरी करतात. सकाळी ते गावी जाण्यासाठी बारामती वरून अहमदनगरला जाण्यासाठी बारामती-औरंगाबाद या एस.टी बस(क्र.एम.एच. ०६, एस. ८३४२)मध्ये बसले. नगरवरून ते त्यांच्या गावी इंदौरला जाणार होते. परंतु नगरला जात असतानाच मढेवडगाव(ता.श्रीगोंदे) परिसरात आल्यावर दुपारी साडेतीन वाजेदरम्यान बसमध्ये रिना यांना अचानक कळा सुरू झाल्या. थोड्याच वेळात तिची चालत्या बसमध्ये प्रसुतही झाली. तो पर्यंत बस घारगांव येथे पोहोचली होती. ही बाब वाहक संदीप लगड यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब चालक श्रावण धामणे यांना कळवली. धामणे यांच्यासाठी हा कसोटीचा क्षण होता. परंतु धामणे यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी घारगांवमध्ये थांबवली. तात्काळ लगड गावातील डॉ. चंद्रशेखर कळमकर यांच्याकडे धावत गेले. डॉ.कळमकर हे धावतच रूग्णालयातून बसमधील रिनापर्यंत पोहोचले. डॉक्टरांनी लगेचच बाळाची नाळ कापली आणि बाकीचे सोपस्कार गाडीतच पार पाडले.डॉ. कळमकर यांनी प्रसुती विनाशुल्क केली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असुन रिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आणि बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बाळ आणि बाळंतीणीसह बस अहमदनगरकडे मार्गस्थ झाली.आपल्याला मुलगा झाला याचा आनंद तर आहेच. चालक,वाहक आणि डॉ.कळमकर यांच्याकडून मिळालेली तत्काळ आणि मोफत सेवा यामुळे आम्हाला आणखी आनंद होत आहे. -रीना आणि राकेश वास्कले 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर