राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या मक्याच्या जनुकीय विकसित चाचणीवरून शेतकरी संघटना व जीएम अभियान आमनेसामने आल्याने घोषणायुद्ध रंगले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर रोखल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा विभागाला धारेवर धरत दोन तास ठिय्या आंदोलन केले़जीएम अभियानाचे कार्यकर्ते गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून आले होते.ते हातात घोषणेचे फलक घेऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा झाले़ ‘अपना बीज अपना राज’,‘ बीज आमच्या हक्काचे नाही कंपनीच्या मालकीचे’, ‘जीएम बीज धोका है, देश बचाने का मोका है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला़ भारत अभियानच्या कार्यकर्त्यांनी सहयोगी संशोधक व अन्य शास्त्रज्ञांची भेट घेऊन निवेदन दिले़ त्यानंतर प्रांगणात सभा सुरू झाली़राज्याच्या विविध भागांतून जमा झालेले शेतकरी प्रवेशव्दाराजवळ आल्यानंतर त्यांना अडविण्यात आले़ सुरक्षारक्षकांनी कार्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव केला़ संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी औषध-बियाणांच्या शहरी दलालांना प्रवेश देता, मग आम्ही काय घोडे मारले, असा सवाल उपस्थित केला़ बीटी वाणामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पाचरट जाऊन सुबत्ता आली आहे, असे मत त्यांनी मांडले़ बियाणे चाचणी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या़ त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोघांना विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यास संमती दिली़भारत अभियानाच्या कविता कुरूंगटवार यांनी बीटी बियाणे प्रसाराला विरोध करीत पशु व मानवाच्या सुरक्षिततेसाठी चाचणीला विरोध केला़ परवानगी नसताना संशोधन क से केले जाते, आम्ही विद्यापीठाशी चर्चा केली असून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुभाष लोमटे, सुहास कोळेकसे, कुमार शिराळकर, कपिल शहा, अश्विन परांजपे यांनी दिला़ शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता भाषणे आटोपती घेत अभियानाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रामभाऊ श्ािंदे, अनिल भुजबळ, गजानन भांडवले, गोविंद जोशी, संजय कोल्हे, प्रकाश पाटील, कैलास तवात, अनिल घनवट, अर्जुन बोऱ्हाडे, अनिल चव्हाण, जयश्री पाटील यांनी मक्याची चाचणी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली़ (तालुका प्रतिनिधी)
जैविक बदलाचा वाद पेटला
By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST