शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम ड्युटी, जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला कोट्यवधीचा गंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:42 IST

नवीन मुंबई  येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि (खारघर) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर : नवीन मुंबई  येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि (खारघर) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ईशकृपा शिपिंग कंपनीचे संचालक नवनाथ नारायण गोळे, लतादेवी यशवंत कांबळे यांच्यासह संतोष कांबळे, निशा कुमकर व दत्ता नावाच्या व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लोढा यांनी त्यांच्या कंपनीसाठी लागणारा अ‍ॅल्युमिनियमचा कच्चा माल दुबई, मलेशिया व सिंगापूर येथून आयात केला होता. हा माल मुंबई येथील न्हावाशेवा  बंदरावर आल्यानंतर तेथील कस्टम ड्युटी व जीएसटी आणि कामाचा मोबदला म्हणून सदर आरोपींनी लोढा यांच्याकडून ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० इतकी जास्त रक्कम घेतली. ही बाब लोढा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुपनर हे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी