कोपरगाव : जोरदार वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला आहे़ ही घटना बुधवारी दुपारी तळेगावमळे शिवारात घडली़पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे येथील रहिवासी माधव फकिरा मोरे (वय ४८)व रामनाथ माधु मोरे (वय १६) हे आपल्या एमएच १५ क्यु ५७० क्रमांकाच्या दुचाकीवरून कोपरगावहून तळेगावमळेकडे जात होते़ त्याच वेळी वैजापूरहून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच ०२ ए़ एच़ ७२१२) दुचाकीस समोरून भरधाव वेगाने धडकदिली़ या धडकेत माधव फकिरा मोरे हे ठार झाले तर रामनाथ मोरे जखमी झाले़ सुदाम मंजाहरी कदम यांच्या तक्रारीवरून कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: October 15, 2024 13:15 IST