शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीजमातेने जिद्दीने पुन्हा उभारला बियाण्यांचा मळा, अतिवृष्टीने डगमगल्या नाहीत राहीबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:45 IST

Bijmata Rahibai Papore: माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण  शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- प्रकाश महालेराजूर (जि. अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे माझ्या बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मीही गावरान भाजीपाला पिकांची दोनदा लागवड केली; पण हातात काहीच आले नाही. हिंमत न सोडता, माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण  शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.चालू खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका बसला आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागली. या काळात त्यांनी घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतात पेरले. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा त्यांच्या शेतीलाही बसला. जिद्द आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही, अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र, निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत, पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. कारली, दोडका, घोसाळी, वाल,  चंदन बटवा, मिरची,  टोमॅटो,  वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज इत्यादी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर