शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 17:34 IST

पतंजली स्टोअरची एजन्सी देण्याच्या नावाखाली नगरसह राज्यभर अनेकांची फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा येथील सायबर पोलीस पथकाने पर्दाफाश केला असून, दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून एका आरोपीस अटक केली आहे़ विकास कुमार असे आरोपीचे नाव आहे़ 

अहमदनगर : पतंजली स्टोअरची एजन्सी देण्याच्या नावाखाली नगरसह राज्यभर अनेकांची फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा येथील सायबर पोलीस पथकाने पर्दाफाश केला असून, दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून एका आरोपीस अटक केली आहे़ विकास कुमार असे आरोपीचे नाव आहे़ पोलिसांनी आरोपीकडून १२ मोबाईल, २४ सीमकार्ड, ४ पेनड्राईव्ह, एक लॅपटॉप, १० एटीएम कार्ड, विविध बँकेचे ६ पासबुक, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पॅनकार्ड, २ मतदान कार्ड, २ आधारकार्ड, १० बँकेचे चेकबुक, एक पासपोर्ट असा एकूण ९१ हजार ६३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ राहुरी येथील देविदास हौशीनाथ दहिफळे (वय ४१) यांना पतंजली उत्पादनाची एजन्सी घ्यायची असल्याने त्यांनी इंटरनेटवर पतंजलीची एक वेबसाईट ओपन केली़ त्या साईटवर असलेला फॉर्म भरून पाठविला़ त्या साईटवर राघवेंद्रसिंग याचा संपर्क क्रमांक दिला होता़ दहिफळे यांनी या क्रमांकावर संपर्क केला़ तेव्हा राघवेंद्रसिंग या व्यक्तीने पतंजलीच्या डिलरशीपसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अकौंटवर रजिस्ट्रेशन फी म्हणून आधी २५ हजार २०० व त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी २ लाख ७५ हजार रूपये भरून घेतले़ त्यानंतर दहिफळे यांना पतंजली डिलरशीप दिल्याचे प्रमाणपत्र मेलवर पाठविण्यात आले़ त्यानंतर राघवेंद्रसिंग याने दहिफळे यांना पुन्हा १० लाख रूपये पाठविण्यास सांगितले़ यावेळी दहिफळे यांना संशय आल्याने त्यांनी पतंजली डिस्ट्रीब्युटरशीप व्हेरिफिकेशन अधिकारी यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी ही वेबसाइट पतंजलीची नसल्याचे सांगितले़ याबाबत दहिफळे यांनी ३० आॅगस्ट रोजी राघवेंद्रसिंग नावाच्या व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक कीर्ती पाटील यांच्यासह पथकाने तपास केला तेव्हा फसवणूक करणारा आरोपी हा पाटणा येथील असल्याचे समोर आले़  पथकाने पाटणा येथे जाऊन विकास कुमार याला अटक केली़ आरोपीने त्याचे साथीदार संदीप कुमार, संतोष कुमार व अमित कुमार यांच्यासमवेत आॅनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवून देशभरातील अनेकांची फसवणूक केल्याची माहिती दिली़ पोलीस उर्वरित आरोपींच्या शोधात आहेत़ पवार, पाटील यांच्यासह उपनिरीक्षक प्रतीक कोळी, महादेव माळवदे, कॉन्स्टेबल राहुल गुंड, अरूण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली़