शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्र शेतकरी संघटना करणार मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:43 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने

पारनेर : दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा करणा-या सरकारकडून अद्याप शेतक-यांचे कर्म माफ करण्यात आलेले नाही. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सरकारविरोधात बलिप्रतिपदेच्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.संघटनेने म्हटले आहे, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात हजारो शेतक-यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापही शेतक-यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे व हजारो शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी १ जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संप करून राज्यसरकारकडे सरसकट कर्जमाफीची व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने शेतकरी संपाची दखल घेत शेतक-यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करुन दिवाळीपूर्वी सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे जाहीर केले होते. तथापि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना बलिप्रतिपदेच्या औचित्यावर बळीराजाची मिरवणूक काढून पारनेर पोलीस ठाण्यात सरकारवर गुन्हा दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस