शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भोंदुबाबाला अटक : सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:29 IST

पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने आज पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली आहे.

अहमदनगर : पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने आज पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली आहे. बबन सीताराम ठुबे असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अश्विन जनार्दन भागवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना भेटून बबन ठुबे या भोंदूबाबाच्या कृत्याविषयी तक्रार केली होती. ठुबे हा डॉक्टर असल्याचे भासवून व जादूटोणा करून विविध आजार बरे करण्याचे सांगत अनेकांची फसवणूक करत होता. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने, कॉन्स्टेबल काळे, मोहन गाजरे, रवींद्र कर्डिले, सागर सुलाने, योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते अश्विन भागवत, मनिषा म्हात्रे, अलका आरळकर हे कान्हूरपठार येथे ठुबे याच्याकडे ग्राहक बनून गेले. यावेळी ठुबे याने जादूटोणा सुरू करताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून काळ्या बाहुल्या, पंचागाचे चित्र, एक स्टेटथस्कोप, पांढ-या कवड्या, काळे बिबवे, अक्रोड, लाल पिवळा पंचरंगी दोरा, अश्वगंध पावडर, त्रिफळा चूर्ण व इतर जादूटोण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अश्विन भागवत यांच्या फिर्यादीवरून ठुबे याच्यासह त्याला मदत करणारे लताबाई बबन ठुबे, विजय बबन ठुबे, सुनीता खोडदे, रोहिणी खोडदे, माधव सोनावळे, अण्णा सोनावळे (सर्व़ रा़ कान्हूर पठार) यांच्यावर कलम ४२० सह महाराष्ट्र जादूटोणा कायदा कलम २ (२), २ (१०) प्रमाणे पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मुलींचे वशिकरण करण्यासाठी सांगायचा उपायबबन ठुबे हा मुलगी नांदत नसल्यास, मुले होत नसल्यास तसेच मुलींचे वशिकरण कसे करावे, यासाठी राख, कोळसे याचा वापर करून जादूटोणा करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केली होती़ तसेच तो स्वत: डॉक्टर असल्याचे त्याच्याकडे येणा-या रूग्णाला सांगत होता. ठुबे याच्या या कृत्याबाबत अंनिसचे कार्यकर्ते भागवत यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून ठुबे याचा भंडाफोड केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर