शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू, चोरीच्या घटनांविरोधात भोजदरी ग्रामस्थ एकवटले; शिवजयंती दिनी ठिय्या आंदोलन

By सुदाम देशमुख | Updated: February 19, 2026 17:05 IST

घारगाव पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव  (जि. अहिल्यानगर): बंद करा… बंद करा… अवैध धंदे बंद करा…! गावातील दारू बंद झालीच पाहिजे…! चोऱ्यांना आळा बसलाच पाहिजे…! अशा संतप्त घोषणा देत संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोजदरी गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी शिवजयंती दिनी (१९ फेब्रुवारी) ठिय्या आंदोलन केले.

भोजदरी हे गाव पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले आहे. डोंगराळ भाग असल्याने येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. मात्र, शेततळ्यांची निर्मिती झाल्याने टंचाईकाळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो, परंतु अलीकडच्या काळात चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घातला आहे. विहिरी, कूपनलिका, शेततळे यांना लक्ष करत केबल, कृषी पंपाच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यासोबतच गावात असंख्य घरफोड्या झाल्या असून, मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकरणांबाबत घारगांव पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्ष तपास होत नसल्याने अनेक चोऱ्यांचे गुन्हे नोंदच होत नाहीत. तक्रार दाखल करताना पोलिसांकडून उलटसुलट प्रश्न विचारले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू असून त्याचाच थेट परिणाम वाढत्या चोऱ्यांवर होत आहे. काही घरांमध्ये चोरट्यांनी स्वयंपाकघरातील भांडीसुद्धा शिल्लक ठेवलेली नाहीत. असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला अवैध दारू बंद करावी व चोऱ्यांचा सखोल तपास लावावा, चोरटे जेरबंद करावे अशी मागणी केली होती. अन्यथा शिवजयंती दिनी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्यानुसार शिवजयंती दिनी गुरुवारी सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, निवेदन देऊनही प्रशासनातील एकही अधिकारी किंवा घारगांव पोलिस आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे प्रशासन या सर्व अवैध प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने तातडीने दखल घेऊन अवैध दारूविक्री व चोऱ्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, अन्यथा लवकरच घारगांव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात ग्रामस्थांसह महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhojdari villagers unite against illegal liquor, theft; protest on Shiv Jayanti

Web Summary : Bhojdari villagers protested against rising theft and illegal liquor sales, alleging police inaction. Frustrated by repeated incidents and lack of police response, they demand immediate action, threatening further agitation if issues persist.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर