शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत माता की जय..साईनामाचा गजर करीत बिहारच्या मजुरांची घरवापसी:  साईनगरीतून पाचवी रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:42 IST

कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी  भारत माता की जय...वंदेमातरम व साईबाबांच्या नावाचा जयघोष केला.

शिर्डी : कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी  भारत माता की जय...वंदेमातरम व साईबाबांच्या नावाचा जयघोष केला.   या मजुरांचा स्वगृही परतण्यासाठी रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारने केला आहे. यासाठी ७ लाख, ७२ हजार ९२० रूपये खर्च आला. घरी परतण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या प्रशासनाला व परतीचे भाडे भरणा-या राज्य शासनाला धन्यवाद देत या मजुरांनी शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता घरची वाट धरली. साईनगरीतून यापूर्वी उत्तरप्रदेशला चार श्रमिक रेल्वेतून ५७३१ मजूर स्वगृही परतले आहेत.    गेल्या सोळा दिवसात पाच रेल्वेद्वारे परराज्यातील ६८३५ मजूर आपआपल्या घरी परतले आहेत. यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, कोपरगावचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, एम़बी़ देसले, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मिना उपस्थीत होते.रेल्वेतील मजुरांना संस्थानच्या वतीने सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी अन्नाची पाकिटे दिली. परिवहन महामंडळाने कामगारांना रेल्वे स्थानकावर पोहोचवण्याची व्यवस्था केली.२०० मजुरांचा घरी परतण्याचा निर्णय रद्दबिहारला स्वगृही परतणा-या मुलांमध्ये राहाता तालुक्यात राहाता व निर्मळ पिंप्री येथे मदरशामध्ये शिक्षण घेत असलेल्या ८६ मुलांचा समावेश आहे. कामे सुरू झाल्याने जवळपास दोनशे मजुरांनी घरी परतण्याचा निर्णय रद्द केला. मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीBiharबिहारLabourकामगार