शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

भंडारद-यात पाच महिन्यात ४४ हजार पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:18 IST

पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ प्रकाश महाले/ वसंत सोनवणे/  राजूर/भंडारदरा : पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. येथील इतिहासाची साक्ष देणारे  गड, किल्ले गिर्यारोहकांना आकर्षित करतात, तर पांडवकालीन हेमाडपंथी मंदिरे येथील पौराणिक आणि धार्मिकतेचे महत्त्व प्राप्त करून देत आहेत. भंडारदरा परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीस  काजवा उत्सव सुरू होतो. मुतखेल नाका ते शेंडी नाका असा पन्नास किलोमीटरच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणा-या गर्द झाडांवर सुरू असणारा काजव्यांचा झगमगाट पर्यटकांना भुरळ घालतो. काजव्यांची सुरुवात होताच येथे पर्यटकांची गर्दी सुरू होत असते, ती फुलोस्तवापर्यंत सुरूच राहते.यावर्षी परिसरात वरुण राजाचे उशिरा आगमन झाले. मात्र तो पडता झाल्यापासून अद्यापपर्यंत उघडण्याचे नावच घेत नाही. त्यामुळेच जूनच्या अखेरीस सुरू झालेला येथील जलोत्सव अद्यापही त्याच जोमाने सुरू आहे. दर  शनिवारी आणि रविवारी येथे पर्यटकांचा ओढा सुरूच आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत ४३ हजार ८४३ पर्यटकांनी  पर्यटनाचा आनंद लुटला. वन्यजीव विभागामार्फत अनेक ठिकाणी प्यागोडे, काही ठिकाणी पायवाट, निरीक्षणासाठी मनोरे, धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंग उभारण्यात आल्या आहेत. मात्र निधीअभावी दुरूस्तीचे काम रखडले आहे.  शेंडी नाका ते घाटघरपर्यंत मुरशेतचा काही भाग वगळता रस्त्याचे काम झालेले असले तरी मुतखेल ते साम्रद दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तुटलेल्या रेलिंग, पायवाटा, पुलांची, शिड्यांची दुरुस्ती, न्हानी फॉलजवळ जाण्यासाठी पायवाट आदी बाबींचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यावर्षी गेल्या पाच महिन्यांत ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनस्थळी भेट दिली. पर्यटकांना सुरक्षित व मनमुरादपणे आनंद घेता यावा यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीचे व नव्याने सुचविलेले कामे सुरू होतील, असे कळसूबाई भंडारदरा अभयारण्य विभागाचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर