शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरवाल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:40 IST

लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे.

अहमदनगर : लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरविणारे व संशय घेऊन कुणाला मारहाण करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोलीस प्रशासन म्हणाले आहे, की गावामध्ये मुले पळविणा-या व दरोडा टाकणा-या टोळ्या आल्या आहेत, अशा स्वरूपाच्या अफवा सोशल मीडिया व इतर प्रकारे पसरवून जनतेमध्ये घबराट व भीतीचे वातावरण पसरविण्यात येत आहे. अशा स्वरूपाच्या अफवांमुळे गावात व वस्तीवर येणारे अपरिचित लोक, साधूवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकरण मारहाण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी व अथवा मृत्युमुखी पडली तर सोशल मीडियावर इतर प्रकारे अफवा पसरविणा-या इसमांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.अशा स्वरूपाच्या अफवांमुळे औरंगाबाद येथे खुनाची घटना घडली असून, या प्रकरणी ५ ते ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाच्या घटना नंदुरबार व मध्य प्रदेश येथेही घडल्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नयेत व कोणी अशा अफवा पसरवित असेल तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.सोशल मीडियातूनच अफवेचा उगममुले पळविणारी टोळी आल्याची अफवा प्रथम दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश व नंदुरबार भागात प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आली. परराज्यातील संग्रहित व्हिडिओ प्रसारित करून त्याखाली दंतकथा सुरू झाल्या. ही अफवा औरंगाबाद, लातूर, बीड ते नगर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सोशल मीडियासह या अफवेची माऊथ पब्लिसिटीही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्यावर सहज विश्वास ठेवत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस