शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातली मिठाई खात आहात सावधान; नगरमध्ये होतंय नियमांचे उल्लंघन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 15:04 IST

मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

अहमदनगर : मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

दसरा आणि दिवाळीनिमित्त मिठाई खरेदीसाठी सध्या ग्राहकांची दुकानांत मोठी गर्दी होत आहे. दुकानांमध्ये ठेवलेली विविध आकारातील आणि आकर्षक पॅकिंगमधील मिठाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मिठाई कधी तयार झालेली आहे आणि ती किती दिवसापर्यंत खावी याचा कुठेच उल्लेख नसतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई दुकानदार स्थानिक ठिकाणीच मिठाई तयार करून त्याचे पॅकिंग करतात. पेढा, श्रीखंड, आम्रखंड, बटर, गुलाब जामून, रबडी, लाडू, काजू कतली अशी विविध प्रकारातील मिठाईचे पॅकिंग करून विकली जात आहे. पॅकिंग डब्बा अथवा बॉक्सवर मात्र हा पदार्थ किती दिवसापर्यंत खाता येईल याचा उल्लेख नसल्याचे 'लोकमत'ने रविवारी (दि.२५ आॅक्टोबर) केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. 

कोणतीही मिठाई तयार केल्यानंतर विशिष्ट कालावधीतच ती खाता येते.  खराब झालेले अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात समोर आल्या आहेत. पैसे कमाईसाठी मिठाई विक्रेते मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरात व जिल्ह्यात मिठाई व इतर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.नामांकित कंपन्यांच्या मिठाईची दुकानदारांना एलर्जी

बाजारात विविध नामांकित कंपन्यांच्या पॅकबंद स्वरूपातील मिठाई व इतर अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. या पॅकिंगवर पदार्थ तयार झाल्याची तारीख व किती दिवस वापरता येईल याचा उल्लेख असतो. कंपनीचे नाव पत्ता व संपर्क क्रमांकही दिलेला असतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई विक्रेते मात्र या नामांकित कंपनीचा माल न ठेवता स्वत: तयार केलेला माल अणि तोही नियमांचे उल्लंघन करून विकत असल्याचे आढळून आले आहे.ग्राहकांनी बिल अवश्य घ्यावेबहुतांश ग्राहक दुकानातून मिठाई खरेदी केली की बिल घेत नाहीत. दुकानदारही स्वत:हून बिल देत नाहीत. मिठाई खराब निघाली तर दुकानदार जबाबदारी झटकतात. अशावेळी ग्राहकांकडेही काहीच पुरावा राहत नाही. त्यामुळे ग्राहकांनी मिठाईसह कोणताही अन्नपदार्थ खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पक्के बिल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग