शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार...गावात प्रवेश कराल तर कारवाई; पहाटे फिरायला येणा-या नागरिकांना फलकाव्दारे इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:50 IST

खबरदार...गावात प्रवेश कराल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक सध्या धामणगाव आवारी गावाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा फलक ग्रामस्थांनी लावला आहे. 

धामणगाव आवारी : खबरदार...गावात प्रवेश कराल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक सध्या धामणगाव आवारी गावाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा फलक ग्रामस्थांनी लावला आहे. अकोले शहरापासून धामणगाव आवारी हे गाव ४ ते ५ किलोमीटर आहे. अकोले शहरातील, उपनगरातील अनेक नागरिक सध्या संचारबंदीचे आणि कोरोनाबाबतच्या नियमांची पायमल्ली करून धामणगाव आवारी रस्त्याने पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गदीर्ने येतात. हे लोक पहाटे पायी चालत थेट धामणगाव आवारी गावातून पुढे निघून जातात. हे लक्षात घेऊन  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धामणगाव आवारी ग्रामपंचायतीने गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा फलक लावून पहाटे फिरायला येणाºया नागरिकांनी आमच्या गावातून प्रवेश केला तर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. एका बाजूला सतर्क होत ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाबाबत जागरूकता दाखवत काळजी घेत आहेत. असे असताना धामणगाव रोडवर अकोले शहरातून सायंकाळी व पहाटे नियमांची पायमल्ली करत फिरायला येतात. सुशिक्षित म्हणवणा-या या लोकांना याबाबत गांभीर्य का नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

अकोले शहर व उपनगरातून पहाटे मोठ्या प्रमाणावर लोक थेट आमच्या गावातून चालत पुढे फेरफटका मारत असतात. त्यांना वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. तरी पोलिसांनी पहाटे व सायंकाळी धामणगाव रोड भागात गस्त वाढवावी, अशी मागणी धामणगाव आवारीचे सरपंच किसन आवारी यांनी केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स