शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीतून बिबट्या पिंज-यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:10 IST

पारनेर तालुक्यातील तिखोल येथील काळूनगरमधील विहीरीतील बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले.

ठळक मुद्दे१५ दिवसापासून वास्तव्य - वनविभागाला आले यश

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील तिखोल येथील काळूनगरमधील विहीरीतील बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले.तिखोल(ता.पारनेर)येथील काळूनगर मध्ये बबन ठाणगे यांच्या शेतामधील विहीरीत मंगळवार (दि.२४) रोजी बिबट्या आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहीती तातडीने टाकळी ढोकेश्वरच्या वनविभागाला कळविली. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या पहाटेच्या दरम्यान पडला असावा असे ठाणगे यांनी सांगितले. वनविभागाच्या कर्मचारी तातडीने घटनास्थळी जावून पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी किसन आगलावे यांच्या सुचनेनुसार वडगाव सावताळ येथून तातडीने पिंजरा आणून जेसीबीच्या साहयाने विहीरीत पिंजरा लावला. मात्र काही वेळातच हा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी निश्वास सोडला.बबन ठाणगे, पोपट मंचरे, भाऊसाहेब ठाणगे, वनपरिक्षेत्र अधिकारी किसन आगलावे, वनपाल दिनकर मुरूमकर, वनरक्षक नाना जाधव, शेख, वैभव गाढवे, अमोल गोसावी, सुरेश पन्हाळे, वनकर्मचारी सुदाम व्यवहारे यांनी परीश्रम घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण शेळके यांनी अहवाल दिल्यानंतर वडगाव सावताळ येथील रोपवाटीकेत पिंज-यात ठेवण्यात आले. बिबट्याचा मुक्काम हलविण्यात येणार आहे.अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्यगेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने अन्नाच्या शोधात परिसरात मुक्काम ठोकला होता. या ठिकाणी दाट झाडी असल्याने मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. मोरांवर उपजिवीका करणा-या या बिबट्याला गागरे वस्ती वडगाव सावताळ रोड(टाकळी ढोकेश्वर) येथे स्थानिक ग्रामस्थांनी पाहील्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते. मात्र मंगळवार (दि.२४) रोजी विहीरीत पडल्याने बिबटया अखेर पिंज-यात अडकल्याने स्थानिक ग्रामस्थांनी निश्वास सोडला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर