कर्जत तालुक्यातील खैदाणवाडी या भागात खडकाळ माळरानावर सायकर यांनी द्राक्ष बाग उत्तमरीत्या फुलवली. सायकर यांच्या बागेतील दर्जेदार द्राक्षे विदेशात गेली. मागील सतरा वर्षांपासून ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांबाबत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र वाढले, उत्पादनही वाढले. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, मंडल कृषी अधिकारी संजय घालमे, रामदास राऊत, कृषी सहायक दत्तात्रय सुद्रीक, रावसाहेब डमरे, संतोष सुरवसे, लक्ष्मण अनारसे, चंद्रकांत तांदळे, कृषी पर्यवेक्षक संदीप पवार, संजय मोढळे, अतुल गदादे, विष्णू हिवरे, प्रकाश सायकर, अनिल खराडे आदी उपस्थित होते.
............
( फोटो - खैदाणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नवनाथ सायकर यांना गेल्या वर्षीचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करताना कर्जत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर.)