शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुळा प्रवरा वीज संस्थेला खंडपीठाची नोटीस, मतदारयादीतून नावे वगळली, लेखापरीक्षणाबाबत आक्षेप, शेतकरी संघटनेची याचिका

By शिवाजी पवार | Updated: April 25, 2023 12:14 IST

Ahmednagar: मुळा प्रवरा वीज संस्थेच्या मतदारयादीतून हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

- शिवाजी पवारश्रीरामपूर (अहमदनगर) - मुळा प्रवरा वीज संस्थेच्या मतदारयादीतून हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने सोमवारी संस्थेला नोटीस बजावली असून २ मे या दिवशी सुनावणी घेतली जाणार आहे.शेतकरी संघटनेचे नेते अनिल औताडे, युवराज जगताप व राहुरी येथील अमृत धुमाळ यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात संघटनेचे नेते व विधिज्ञ अजित काळे हो काम पाहत आहेत. ॲड साक्षी काळे व ॲड प्रतीक तलवार त्यांना सहाय करत आहेत.

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ २०१६ मध्ये संस्थेवर सत्तेवर आले. त्यानंतर कोविडमुळे अनिश्चित काळासाठी निवडणूक लांबली गेली. २०२१ मध्ये औताडे यांनी संस्थेची निवडणूक घेण्याची मागणी केली. मार्च २०२३ मध्ये सहकार उपनिबंधकांनी मतदारयादीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला. मतदारयादीवर हरकती मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी झाली. मात्र संस्थेच्या १ लाख ७० हजार सभासदांपैकी केवळ ५४ हजार सभासदांना अंतिम यादीत घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

संस्थेच्या १ लाख १६ हजार सभासदांची नावे बेकायदेशीरपणे निवडणुकीतून वगळण्यात आली आहे. लेखापरीक्षण अहवाल न देताच सर्वसाधारण सभा घेतली गेली. सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७५ चे उल्लंघन झाले आहे. सहकार उपनिबंधकांकडे वेळोवेळी अर्ज करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

संचालक मंडळाला बरखास्त करावे, निवडणुका निपक्षपातीपणे करण्याकरिता संस्थेवर प्रभारी नेमण्यात यावे, वगळण्यात आलेले मतदार मतदानास पात्र ठरवावे अशा प्रमुख मागण्यांचा याचिकेत समावेश आहे. याचिकेकडे श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAhmednagarअहमदनगर