शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कार्यकर्त्यांची नेत्यांवरच श्रद्धा !

By admin | Updated: July 30, 2016 00:30 IST

शिर्डी/ आश्वी : शिर्डी देवस्थानच्या विश्वस्तपदी राधाकृष्ण विखे यांचे नाव नसल्याचे समजताच मतदारसंघात तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला़

शिर्डी/ आश्वी : शिर्डी देवस्थानच्या विश्वस्तपदी राधाकृष्ण विखे यांची सरकारने स्थानिक आमदार म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित होते़ मात्र, शुक्रवारी राजपत्रात विखे यांचे नाव नसल्याचे समजताच मतदारसंघात तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला़ बाभळेश्वर व कोल्हार येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ तसेच शिर्डी येथे कैलास कोते यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे़संस्थानच्या विश्वस्तपदी निवडीमध्ये स्थानिक आमदार म्हणून राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याने माजी नगराध्यक्ष कैलास कोते, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद कोते आदींनी निषेध केला आहे़ विखे यांना येथे काम करण्याचा असलेला अनुभव व त्यांच्या माध्यमातून झालेली कामे, यामुळे त्यांचा विश्वस्त मंडळात समावेश आवश्यक आहे़ याबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास येत्या एक-दोन दिवसानंतर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़ निवेदनावर विजय कोते, प्रा़ ज्ञानेश्वर शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, रतीलाल लोढा, उत्तम कोते, राजेंद्र कोते, गोपीनाथ गोंदकर, नितीन शेळके, वेणुनाथ गोंदकर, दिलीप शेळके, नितीन कोते, प्रताप जगताप, अशोक गोंदकर, दत्ता कोते आदींची नावे आहेत़ या मागणीसाठी बाभळेश्वर येथे विखे समर्थकांनी शुक्रवारी सायंकाळी रास्ता रोको केला. ‘विखेंना डावलून शिर्डी मतदारसंघाचा अपमान’आश्वी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांना डावलून भाजपा सरकारने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा अपमान केला आहे़ त्यामुळे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांनी दिला़४साई संस्थानच्या विश्वस्त पदाची यादी जाहीर होताच शिर्डी विधानसभा मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे़ शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची विश्वस्तपदी नेमणूक करणे गरजेचे होते, मात्र भ्रष्ट युती सरकारने विखे यांना डावलून मतदारसंघाचाच अपमान केला आहे़ चित्तेंना डावलल्याने भाजपा कार्यकर्ते नाराजश्रीरामपूर : शासनाने शिर्डी संस्थानवर विश्वस्तांच्या नेमणुका करताना श्रीरामपूरचे भाजप नेते प्रकाश चित्ते यांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे भाजप-सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले असून राजीनामा देण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचले आहेत. शिर्डी संस्थानवर विश्वस्तांची नियुक्ती करताना शासनाने समाजमनाचा विचार करावयास हवा होता. मात्र तो विचार झाला नाही. त्यामुळेच चित्ते यांना संस्थानवर विश्वस्त पदापासून बाजूला ठेवले गेले. हिंदुत्व चळवळ संपविण्यास निघालेल्या व्यक्तीशी घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तीची श्रीरामपुरातून संस्थानवर नियुक्ती दिल्याचा आरोप विजय लांडे यांनी केला़चित्तेंना वगळून अप्रत्यक्षपणे ससाणेंनाच दिले बळश्रीरामपुरात कॉँग्रेस म्हणजेच ससाणे, त्यांच्या विरोधात गत तीस वर्षांपासून चित्ते हे लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस विरोधात भाजप व हिंदुत्वाची चळवळ तालुक्यात उभी राहिली.पण आता चित्तेंना वगळल्याने ही ससाणेंना एकप्रकारचे बळ मिळाल्याची भावना लांडे यांनी व्यक्त केली़