शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर-नेवासा-गेवराई-बीड-परळी रेल्वे मार्गाचे होणार फेरसर्व्हेक्षण; आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:26 IST

बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात १ डिसेंबर पासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. जून २०१८ पर्यंत या मार्गाचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबर पासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. जून २०१८ पर्यंत या मार्गाचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.याबाबत नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेऊन (गुरुवारी) उपोषणाच्या सातव्या दिवशी उपोषणार्थींच्या मागण्या मान्य करून जून २०१८ पर्यंत बेलापूर - परळी या रेल्वे मार्गाचे फेरसर्वेक्षण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले. या आश्वासनाचे पत्र आमदार मुरकुटे यांच्याकडे रेल्वे प्रशासनाने सुपूर्द केले. त्यामुळे गुरूवारी रात्री उशीरा भाजापाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिनकर गर्जे, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, अभिजीत लुनिया यांनी उपोषणार्थी रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड यांची भेट घेऊन लेखी पत्र आल्याची माहिती देऊन उपोषण सोडण्याविण्याची विनंती केली. त्यामुळे बेरड यांच्या हस्ते शरबत घेऊन रात्री उशिरा हे उपोषण सोडण्यात आले. शुक्रवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते ते लेखी पत्र उपोषणार्थींना सुपूर्त करण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा