शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; शंभरहून अधिक भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:09 IST

महाशिवरात्रीनिमित्ताने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात १०० हून अधिक भाविक जखमी झाले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत ३१ रुग्णांनी उपचार घेतले. यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले.

राजूर : महाशिवरात्रीनिमित्ताने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात १०० हून अधिक भाविक जखमी झाले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत ३१ रुग्णांनी उपचार घेतले. यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले. जखमी झालेल्या भाविकांमध्ये पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर व परिसरातील संख्या अधिक होती. अकोले तालुक्यातील भाविकांची संख्या पंधराहून अधिक आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने हरिश्चंद्र गडावर पुणे, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यातून हजारो भाविक येत असतात. शुक्रवारी दुपारी काही भाविक हरिश्चंद्र गडावर चढ-उतार करीत होते. हरिश्चंद्रगडाचा पहिला टप्पा पार केल्यानंतर डोंगराच्या एका कड्याच्या कपारीत मध्यभागी असणाºया मधमाश्यांच्या पोळाला एका अज्ञात पर्यटकाने दगड मारला. दगड मारताच पोळावरील मधमाशा उठल्या. यावेळी या ठिकाणाहून जाणाºया अनेक भाविकांना या मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाशा उठल्या असे समजताच भाविकांची एकच धावपळ उडाली. वनविभागाचे कर्मचा-यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी भाविकांना थांबवले. सुमारे दीड तास भाविकांना चढ, उतार करण्यास थांबविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही लोकांच्या अंगावरील या माश्या काढण्याचे काम गडावर कुटुंबासह जात असलेल्या आळेफाटाच्या प्रा.जयसिंग गाडेकर यांनी केले. यातील काही जखमींना त्यांनी स्वत:च्या व इतर वाहनातून राजूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या १७ जखमींवर डॉ.आर. पी. दिघे यांनी उपचार केले. तर येथील डॉ.बाबासाहेब गोडगे, डॉ.टी.के. लांडे यांच्या रुग्णालयात काही जखमींवर उपचार करण्यात आले. तर काही जखमींनी अकोले, कोतूळ, आळेफाटा आदी ठिकाणी उपचार घेतले असल्याची माहिती समजली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले