या सर्व रुग्णालयांमध्ये १८० बेड्स उपलब्ध असताना तब्बल २१० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पर्हे यांनी लोकमतला दिली. तीन रुग्णालयांनी कोरोना उपचाराकरिता प्रस्ताव दिला असून त्यांना मान्यता मिळाल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---------------
पॉझिटिव्ह दर ३५ टक्के
शहरात सध्या दररोज सरासरी २०० कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात ७० रुग्ण संक्रमित मिळून येत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा दर ३५ टक्क्यांवर गेला आहे. मागील काळात हा दर १५ ते २० टक्के होता, अशी माहिती डॉ.पर्हे यांनी दिली.
---------------
दोन दिवस लसींचा तुटवडा
ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन दिवस लस उपलब्ध नव्हती. गुरुवारी मात्र नगरहून लस पोहोच झाल्यामुळे लसीकरण मोहीम सुरू झाल्याची माहिती डॉ. योगेश बंड यांनी दिली. लस पुरवठ्याची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी ऐन वेळी दिली जाते. त्यामुळे नागरिकांना पूर्वसूचना देता येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शहरात दोन खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असले तरी तेथेही लस उपलब्ध नव्हती, अशी माहिती मिळाली.
--------------