शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ‘अशी ही बनवाबनवी’- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 15:11 IST

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत ...

ठळक मुद्दे बच्चू कडू म्हणाले,सेनेचा वाघ विधानभवनात मांजर होतोमंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत गेल्यावर मांजर होते. शेतक-यांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकून सरकारने बनवाबनवी केली आहे़ याविरोधात २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी दिला़श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एल्गार शेतकरी मेळाव्यात आ. कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते़.कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ नेत्यांमध्ये सेवेचा भाव राहिलेला नाही़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मरण होत आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़प्रहार संघटना ही जात, धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली नसून जनतेला सेवा आणि सामर्थ्य देण्याच्या हेतूने उभी राहिली आहे़ मला श्रीमंत कार्यकर्त्यांची गरज नाही़ शेतकरी, दिन, दलित, अपंगाच्या प्रश्नावर लढणा-या कार्यकर्त्यांची गरज आहे़मोदी, तेंडुलकरवर टीकारामरहीमसारख्या पाखंडी बाबांच्या पायावर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस डोकं टेवकतात. अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबाला वर्षा बंगल्यावर आणून अभिषेक घातला. सचिन तेंडुलकरने या बाबांच्या अंगावर शाल चढविली, त्या तेंडूलकरचा शेतक-यांच्या मुलांनी जयजयकार केला़ मात्र, तेंडुलकरने एखाद्या शेतक-याच्या खांद्यावर शाल का चढविली नाही, असा टोला आ़ बच्चू कडू यांनी मारला.