शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 17:10 IST

दि़ कोपरगाव पिपल्स को़ आॅपरेटेटिव्ह बँकेच्या शहरातील गंजबाजार शाखेत बनावट सोने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहमदनगर: दि़ कोपरगाव पिपल्स को़ आॅपरेटेटिव्ह बँकेच्या शहरातील गंजबाजार शाखेत बनावट सोने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद शफाखत बशीद (वय ३० रा. कोठला, नगर) व अजरूद्दीन शफी शेख (वय २८ रा. केडगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी बँके शाखेचे व्यवस्थापक विद्यानंद विनायक रसाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.शफाखत बशीद याने शनिवारी बँकेत ५५ ग्रॅम सोने तारण ठेवून १ लाख रूपयांचे कर्ज घेतले. यावेळी रसाळ यांनी सय्यद याची फाईलची तपासणी केली. यामध्ये सय्यद याने ४, ७ व १४ आॅगस्ट रोजी सोने तारण ठेवून ३ लाख १० हजार रूपयांचे कर्ज घेतल्याचे निदर्शनास आले. सय्यद याने तारण ठेवलेल्या सोन्यावर रसाळ यांना संयश आला. सय्यद याचा मित्र अजरूद्दीन शेख याचीही फाईल पाहिली तेव्हा त्यानेही २९ व ३० आॅगस्ट रोजी बँकेत १०१ ग्रॅम सोने तारण ठेवून १ लाख ८० हजार रूपयांचे कर्जत घेतले होते. रसाळ यांनी बँकेचे सोने तपासणारे संजीव शहा यांना बोलावून सय्यद व शेख यांनी तारण ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली तेव्हा हे सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या फाईलवर तुमची स्वाक्षरी असल्याचे सांगत रसाळ यांनी शेख व सय्यद यांना बँकेत बोलावून घेतले. दरम्यान या घटनेबाबत कोतवाली पोलीसांना माहिती देण्यात आली होती. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरिक्षक चव्हाण हे करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस