श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत असणा-या एका जणाला मारहाण करण्यात आली. प्रतीक दामोधर गजभिये असे या कर्मचा-याचे नाव आहे. गुरुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण करत, दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. खंडणीप्रकरणी गोरख पांडुरंग लोखंडे (मुंजोबा चौक, रा. श्रीगोंदा) याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.१४ जून रोजी सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गजभिये दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना मुंजोबा चौकात गोरख पांडुरंग लोखंडे याने शिवीगाळ केली. तुला बँकेत नोकरी करायची असेल, येथे राहायचे असेल तर मला तुला १० हजार रुपये द्यावे लागतील, असा दमही दिला. मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवणनाथ दहिफळे हे करत आहेत.
श्रीगोंद्यात खंडणीसाठी बँक कर्मचा-याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 14:58 IST