शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

अनेक शाळांवर बंदचे गंडांतर

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

श्रीगोंदा : गुगल मॅपिंगव्दारे झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची आठ विद्यार्थी असलेली शाळा बंद करण्यात येणार आहे.

श्रीगोंदा : गुगल मॅपिंगव्दारे झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची आठ विद्यार्थी असलेली शाळा बंद करण्यात येणार आहे. तसेच दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या अनेक शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. गुगल मॅपिंगच्या सर्व्हेनुसार ज्या दोन प्राथमिक शाळांमधील हवाई अंतर एक कि. मी. किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दोन शाळांपैकी वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेली एक प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहे. पुणे येथे आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षण आयुक्त एस. पोकलिंगम यांनी या सर्व्हेनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार गाव व तालुकानिहाय दोन प्राथमिक शाळांमधील हवाई अंतर मोजणे, कोणती शाळा बंद करावी, नजीकच्या अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.या सर्व्हेनुसार वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या काही शाळा बंद झाल्यानंतर उर्वरित शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार आहे. यामध्ये मोठ्या शाळांचा गुणात्मक, भौगोलिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.सर्व्हेनुसार लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची शाळा बंद करुन या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पारगाव शिवारातील खेतमाळीस मळा शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिल्या आहेत.वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील शाळांवर गंडांतर येऊन त्या मोठ्या प्रमाणावर बंद पडण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या शाळांमध्ये समायोजन करताना विद्यार्थ्यांची येण्या, जाण्याची सुविधा न केल्यास अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)७७ शाळांमध्ये कमी मुलेश्रीगोंदा तालुक्यातील ३७२ प्राथमिक शाळांपैकी ७७ शाळांची वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेली अलभरमळा (देवदैठण) शून्य विद्यार्थी, भांबवाडी (पिंप्रीकोलंदर) ६, कोळपेमळा (बोरी) ८, वडाची वस्ती (चिखली), विधातेवस्ती (हंगेवाडी), टेमगिरी मळा (राजापूर) या शाळांची विद्यार्थी संख्या दहा आहे. या शाळांवर बंदची टांगती तलवार आहे.